शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृती दल स्थापन   

उच्च शिक्षणमंत्र्यांची संस्थाचालकांसोबत सकारात्मक बैठक

पुणे : राज्यातील शिक्षण संस्थांच्या विविध प्रश्नांची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत संस्था चालकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संस्थाच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी व संस्थांचालकांशी नियमित संपर्क राहण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. संस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती शिक्षण संस्थांचालकांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली.
 
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट्स यांच्यातर्फे बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. उच्च शिक्षणमंत्री पाटील यांची मंगळवारी (दि.१३) संस्था चालकांबरोबर झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे व उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे उपस्थित होते. 
 
बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. उच्च शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी संस्थाचालकांचे प्रतिनिधित्व शुल्क नियामक प्राधिकरणात असावे, अशी मागणी करण्यात आली असून त्यावर सरकार सकारत्मक आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत असणार्‍या सर्व विषयाची माहिती घेत त्यादृष्टीने त्वरित निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उच्च शिक्षणमंत्री पाटील यांनी दिले आहेत.
 
डॉ. एकबोटे म्हणाले, उच्च शिक्षणमंत्र्यांची झालेल्या चर्चेअंती अभियांत्रिकी व औषनिर्माण शास्त्रच्या नव्या महाविद्यालयांना शासनाकडून किमान दोन वर्षे ‘एनओसी’ दिली जाणार नाही. तसेच बीबीए, बीबीएस अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त राहिलेल्या जागांसाठी अतिरिक्त सीईटी घेण्याचे संकेत शासनाकडून मिळाले आहेत.शुल्क नियामक प्राधिकरणात सुसूत्रता यावी, यासाठी त्यांच्या कमिटीत संस्थाचालकाचे एक प्रतिनिधी घेण्यात यावे आणि संस्थाचालकांच्या अनेक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कृती दल नेमले जाणार असल्याचे डॉ. एकबोटे यांनी सांगितले.
 

Related Articles